करिअर शिबीर मेळाव्याचे 25 रोजी आयोजन
सातारा दि.23 (जिमाका) : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मार्फत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातारा यांच्यावतीने छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हा करिअर शिबीर मेळावा स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, जिल्हा परिषद जवळ सातारा येथे दिनांक 25 जून रोजी दुपारी 01.00 वाजता आहे. पालकमंत्री शंभुराज देसाई, यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. यावेळी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपस्थितीत असतील.
या शिबिरात इयत्ता 10 वी, 12 वी, पदवीधर, आय. टी. आय, तांत्रिक अभ्यासक्रमाची मुले मुलींसाठी रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी बाबत तज्ञामार्फत मार्गदर्शन होणार आहे. तसेच अनेक नामावंत कंपनीच्या सहभागाने रोजगार मेळाव्याचेही आयोजन आहे, तरी सातारा परिसरातील इयत्ता 10 वी ते पदवीधर, बेराजगार, तांत्रिक शिक्षणाचे विद्यार्थी उमेदवार यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्राचार्य, संजय मांगलेकर यांनी केले आहे.
No comments