फलटण येथे छ. राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव सोहोळा उत्साहात संपन्न
फलटण (गंधवार्ता फलटण) - राजर्षी छत्रपती शाहुराजे ज्ञान विकास प्रसारक मंडळाच्या माध्यमातून छ. शाहू महाराज शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव सोहोळा मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी थाटात साजरा करण्यात आला.
मंगळवार पेठेतून छ. शाहू महाराज यांच्या प्रतिमेची शोभायात्रा प्रतिवर्षीप्रमाणे काढण्यात आली, जयंती समितीचे अध्यक्ष बापूसाहेब तुकाराम जगताप, प्रा. डॉ. प्रभाकर पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव, मुरलीधर सावंत, जयंती समितीचे सदस्य प्रदीप जगताप, मुख्याध्यापक बंडी सर, शिंदे साहेब (बारामती), नंदू गायकवाड या मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केल्यानंतर मिरवणुक सुरु झाली.
मंगळवार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, क्रांतिसिंह उमाजी नाईक चौक, गजानन चौक महात्मा फुले चौक या मार्गाने मिरवणूक जात असताना या सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
जयंती सोहळ्यामध्ये शाहू महाराजांना अभिप्रेत असलेले पारंपारिक वाद्यांचा समावेश होता, विशेषतः मुलींचे लेझीम पथक, झांज पथक, सनईसूर, हालगी, संबळ, तुतारी इत्यादी वाद्यांचा मिरवणुकीत समावेश होता. सामाजिक समतेचे प्रणेते, बहुजन समाजाचे उध्दारक छत्रपती शाहू महाराज जयंती सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला.
मिरवणूक दरम्यान फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले, विशेष म्हणजे मुलींच्या लेझीम पथकाने शाहू महाराज यांच्यावरती छान गीत सादर केले, त्यामधून छ. शाहू महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परदेशी शिक्षण व त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा या गीता मध्ये घेतला आहे.
जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमास गणेश अहिवळे, संजय अहिवळे (आण्णा), अमर काकडे, कुंदन अहिवळे, राजेश काकडे, राजरत्न जगताप, आकाश काकडे, वैभव काकडे, निलेश मोरे, जय रणदिवे, जितेंद्र कांबळे, सनी काकडे, सनी मोरे, आर.पी.आय. चे विजय येवले, मुन्ना शेख, सतीश अहिवळे, राजू मारुडा, शुभम गुंजाळ, ओम भुई, प्रेम घुले, शुभम जगताप, बिरजू अहिवळे वगैरेंची उपस्थिती व सहभाग लाभल्याचे सांगत जयंती समितीचे अध्यक्ष बापूसाहेब जगताप यांनी सर्वांना धन्यवाद देत आभार मानले.
No comments