आ. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा व शालेय अभ्यासक्रमात मानुस्मृतीचा अध्याय घेऊ नये
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२ - आ. जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे आंदोलन केले, त्यामध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्यात आला. त्यामुळे समस्त आंबेडकरी समाजाच्या भावना दुखवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आ. जितेंद्र आव्हाड यांचा जाहिर निषेध व्यक्त करून, त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, त्याच बरोबर शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीच्या कोणत्याही प्रकाराच्या श्लोक आध्यायाचा समावेश करु नये.या मागणीसाठी फलटण प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
प्रांत अधिकारी डाॅ.सचिन ढोले यांना निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते हरिश काकडे, दादासाहेब चोरमले, शक्ती भोसले, सिध्दार्थ दैठणकर, जयकुमार रणदिवे,राम विकी काकडे,शिवा अहिवळे राम अहिवळे,मोंटी मोरे,श्री अहिवळे,माधव जामदाडे, लखन अहिवळे,सागर घोलप, अल्ताफ पठाण, लक्ष्मण काकडे,लखन वाघमारे,रोहित अहिवळे, दया पडकर,राकेश जगताप अदि कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments