श्वास संस्थेच्या वतीने १० वि १२ वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१२ - "श्वास" बहुउद्देशीय विकास संस्था,फलटणच्या वतीने दि.१३/६/२०२४ रोजी सांयकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन (नवीन समाज मंदिर) या ठिकाणी सायंकाळी दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी करियर विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी या मार्गदर्शनाचा विद्यार्थी मित्रांनी लाभ घ्यावा असे आवाहन "श्वास" बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
"श्वास" बहुउद्देशीय विकास संस्थेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला प्रेरणा मिळेल असे काम करणार असल्याचे मंगेश सावंत, कपिल काकडे, मुकेश अहीवळे, दयानंद पडकर ,चंद्रकांत मोहिते, शुभम अहिवळे, मोहन ढावरे यांनी कळविले आहे.
No comments