Breaking News

शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास महाविद्यालयांना 15 जूनपर्यंत मुदत

Deadline for colleges to fill scholarship applications is June 15


     सातारा, दि. 13 :-  शिष्यवृत्ती व व्यावसायिक पाठ्यक्रमास शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह निर्वाह भत्ता या योजनेचे अनु जाती प्रवर्गातील महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नुतनीकरण (Renewal) व नवीन अर्ज नोंदणी (Fresh) दि. ११/१०/२०२३ पासून सुरूवात करण्यात आलेली आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयास संकेतस्थळाव्दारे तसेच समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय पात्र विद्यार्थ्यांचे सदर संकेतस्थळावरुन अर्ज भरुन मंजुरीस्तव सादर करणेबाबत वेळोवेळी कळविण्यात आलेले आहे. याबाबत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे व सद्यस्थितीत अंतिम मुदत हि 15 जून, 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे, महाविद्यालयांनी प्रलंबित शिष्यवृत्तीचे अर्ज वेळेत भरावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.

    मागासवर्गीय विद्याथ्यांनी ऑनलाईन भरलेले अर्ज महाविद्यालयांचे स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत आहे. सन 2023-2024 हे शैक्षणिक वर्ष संपलेले असताना देखील महाविद्यालय / महाविद्यालय प्रशासनाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत ही बाब गंभीर स्वरुपाची आहे.

    जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना दिनांक 14 जून 2024 पुर्वी महाविद्यालयामध्ये प्रवेशित असणा-या पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन माध्यमातून पडताळणी करुन सदर विद्यार्थ्यांचे अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण सातारा यांच्याकडे मंजुरीसाठी वर्ग करावेत.  तसेच सदर बाब मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांशी संबंधीत असल्याने यास प्रथम प्राधान्याने करण्याबाबत व याबाबत कोणत्याही प्रकारे टाळाटाळ अथवा हलगर्जीपणा करु नये. महाविद्यालय/ महाविद्यालय प्रशासनाकडून कार्यवाही न झाल्यास पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास संबंधीत महाविद्यालय व महाविद्यालय प्रशासन यांना जबाबदार धरण्यात येवून प्रचलित शासन निर्णयानुसार व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 (सुधारित नियम 2015 नुसार) गुन्हे दाखल करणेची प्रक्रिया करण्यात येईल , असेही समाज कल्याणचे सहायक आयुक्त श्री . उबाळे यांनी कळविले आहे.

No comments