पालखी मार्ग व शहरातील प्रमुख भागातील अतिक्रमणे तात्काळ काढावीत - मुख्याधिकारी
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.27 - श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२४ दिनांक ०९/०७/२०२४ रोजी फलटण मुक्कामी येत आहे. सदरचे आषाढी वारी पालखी सोहळा २०२४ च्या अनुषंगाने फलटण नगर परिषद हद्दीतील पालखी मार्गावरील तसेच शहरातील प्रमुख भागातील अतिक्रमण व रस्त्यावरील राडारोडा उचलणे आवश्यक आहे. तरी श्री. निखिल मोरे, मुख्याधिकारी, फलटण नगर परिषद यांचे वतीने फलटण शहरातील नागरीकांना पुढीलप्रमाणे आवाहन करणेत आलेले आहे. फलटण शहरातील नागरीकांनी त्यांचे पालखी मार्गावरील तसेच शहरातील प्रमुख भागातील असणारे अतिक्रमण तात्काळ काढून घेणेची कार्यवाही करावी व रस्त्यावरील राडारोडा तात्काळ काढून घेणेत यावा, अन्यथा महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औदयोगिक अधिनियम १९६५ चे कलम १७९ व १८० अंतर्गत सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण, राडारोडा कोणतीही पुर्वसूचना न देता नगर परिषदेमार्फत काढून टाकणेत येईल व यामुळे होणारे नुकसानीस संबंधित जागामालक जबाबदार धरणेत येऊन त्यांचेकडून याकामी होणारा खर्च नियमानुसार वसुल करणेत येईल मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी कळविले आहे.
No comments