प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - कृषी विभागाचे आवाहन
सातारा : नैसर्गिक आपत्ती, कीड रोग इत्यादी कारणांने पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांचे स्थैर्य अबाधित राखण्यासाठी केंद्र शासनाने खरीप हंगाम 2024 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना पुढे सुरु ठेवली आहे. सातारा जिल्ह्यातील तालुकानिहाय महसूल मंडलनिहाय पिके व क्षेत्रे अधिसूचित केली असून भात, ख. ज्वारी, बाजरी, नाचणी, भूईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, व ख. कांदा 9 पिकांसाठी ही योजना लागू आहे. शेतकऱ्यांनी फक्त 1 रुपया विमा हप्ता रक्कम भरावयाची असून उर्वरीत विमा हप्ता केंद्र व राज्य शासन भरणार आहे. या याजनेत सहभागी होण्यासाठी 15 जुलै 2024 ही अंतिम मुदत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली आहे.
अनिश्चित हवामानामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याने तसेच पिकांच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक- यांचे अर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याचे काम या योजनेद्वारे होत असल्याने व फक्त एक रुपयांमध्ये योजनेत सहभागी होत येणार आहे.
बिगर कर्जदार शेतकरी वैयक्तिकरित्या आपले अर्ज विमा कंपनीस सादर करुन अथवा विमा कंपनीच्या संकेत स्थळाद्वारेही या योजनेत सहभागी होऊ शकतील. योजनेत सहभागी होणेसाठी आवश्यक विहीत नमुन्यातील अर्ज बँकेकडे व विमा कंपनीकडे उपलब्ध असून शेतक-यांनी ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत आपले खाते आहे त्या बँकेत जाऊन अथवा पोस्ट कार्यालय, विमा कंपनी एजंट किंवा सार्वजनिक सुविधा केंद्र व विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारे ३१ जूलै २०२३ पूर्वी हप्ता भरणेविषयीचे तसेच अधिक माहीतीसाठी गाव पातळीवरील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.
No comments