दुधेबावीत प्रचंड पाऊस ; फलटण-दहिवडी रस्त्यावर पाणीच पाणी
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१७ -दुधेबावी ता. फलटण परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे सर्वत्र पाणी झाले असून, फलटण - दहिवडी रस्त्यावर देखील तीन ठिकाणी पाणी साठलेले आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.
फलटण तालुक्यातील दुधेबावी परिसरात आज सोमवार दिनांक १७ जून रोजी दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे परिसरात सर्वत्र पाणी साचलेले आहे. फलटण दहिवडी जाणाऱ्या रस्त्यावरही तीन ठिकाणी पाणी साठले आहे. फलटण ग्रामीण पोलीस घटनास्थळावर पोहोचले असून प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.
No comments