होलार समाज यंग ब्रिगेडचे नूतन प्रदेशाध्यक्ष हनुमंतदादा केंगार यांचे फलटण येथे महापुरुषांना अभिवादन
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.2- माळशिरस तालुक्यातील चाकोरे या गावी होलार समाज यंग ब्रिगेडच्या शाखा उद्घाटन प्रसंगी सर्वानुमते वालचंदनगरचे युवक नेतृत्व हनुमंतदादा केंगार यांची निवड झाली.
नियुक्तीनंतर पहिल्यांदाच केंगार यांचा दौरा फलटण याठिकाणी होता. यावेळी प्रदेशाध्यक्ष हनुमंत केंगार आणि सरपंच नवनाथ अहिवळे यांनी समाज बांधवांसमवेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त फलटण येथील अहिल्यादेवी होळकर चौक येथे अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले या महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्यांचे स्वागत व सत्कार युवक नेतृत्व महेंद्र गोरे, होलार समाजाचे फलटण तालुकाध्यक्ष गणेश गोरे, सामाजिक कार्यकर्ते दशरथ जाधव, योगेश गोरे आणि अविनाश जाधव यांनी केले.
No comments