संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विश्वस्तांकडून फलटण पालखी तळाची पाहणी
फलटण (फलटण गंधवार्ता) - श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २९ जून रोजी प्रस्थान होत असून, ९ जुलै रोजी फलटण मुक्कामी पालखी सोहळा येत आहे. या पार्श्वभूमीवर फलटण प्रशासन व पालखी सोहळ्याचे विश्वस्त यांची पूर्वतयारी सुरू आहे. पालखी सोहळ्याचे मुख्य विश्वस्त यांनी फलटण शहरातील पालखी तळाला भेट दिली.
यावेळी पालखी तळ व पालखी विसावा तळ या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता करण्यात यावी, तसेच पिण्याचे व वापराचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करावे. पालखी सोहळ्याच्या आगमनावेळी वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी व पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्थेत आवश्यक ते बदल करावेत, अशा सूचना करण्यात आल्या.
No comments