कोळकी येथे लूटमार ; दुचाकीस्वारास अडवून मोबाईल व आंगठी केली लंपास
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२3 - कोळकी ता. फलटण येथे दुचाकी स्वारास अडवून, त्याचा मोबाईल व सोन्याची अंगठी हिसकावून घेऊन, स्वारास हाताने व धारदार शस्त्राने मारहाण केल्याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१) गोटया फडतरे (पुर्ण नाव माहीत नाही) २) शुभम धुमाळ (पुर्ण नाव माहीत नाही) ३) संदीप हुंबे (पूर्ण नाव माहीत नाही) तिघे राहणार - धुमाळवाडी, ता. फलटण, जि.सातारा ४) नवनाथ सुर्यवंशी (पुर्ण नाव माहित नाही),रा. सोनवडी, तालुका. फलटण, जि. सातारा अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, दिनांक २०/६/२०२४ रोजी रात्रौ १०.३० वाजण्याच्या सुमारास कोळकी, तालुका. फलटण येथील महाराजा बझार येथे, अभिषेक विठ्ठल गुंजवटे रा.झिरपवाडी ता.फलटण हे कमिन्स कंपनी सुरवडी येथून त्यांची मोटार सायकल क्र. एम एच १४ - जे एफ २३५५ वरुन घरी येत असताना रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास कोळकी येथील महाराजा बझार येथे, पाठीमागून मोटार सायकल वरून येवून १) गोटया फडतरे (पुर्ण नाव माहीत नाही), २) शुभम धुमाळ (पुर्ण नाव माहीत नाही), ३) संदीप हुंबे (पूर्ण नाव माहीत नाही) तिघे राहणार - धुमाळवाडी, ता. फलटण, जि.सातारा, ४) नवनाथ सुर्यवंशी (पुर्ण नाव माहित नाही),रा. सोनवडी, तालुका. फलटण, जि. सातारा या चौघांनी मिळुन, गुंजवटे यांच्या मोटार सायकलचा पाठलाग करून, गुंजवटे आडवले व त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला व उजव्या हातातील बोटामधील सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेवून, लाथाबुक्क्यांनी गुंजवटे यांच्या पाठीत, छातीवर, डोक्यात बेदम मारहाण करून अनोळखी धारदार शस्त्राने उजव्या व डाव्या हातावर मारहाण करून जखमी केले तसेच पायावर दगड मारून जखमी केले असल्याची फिर्याद अभिषेक गुंजवटे यांनी दिली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दातीर हे करीत आहेत.
No comments