अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; साखरवाडी येथील एकाच्या विरोधात पोक्स अंतर्गत गुन्हा
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) - साखरवाडी ता. फलटण येथील अल्पवयीन मुलीला लज्जास्पद बोलून, तिचा पाठलाग करून तिला रस्त्यात अडवून धमकी दिल्याप्रकरणी साखरवाडी येथील संशयित मनोज महादेव शिंगाडे यांच्या विरोधात आयपीसी, पोक्सो व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, दि १५ रोजी सकाळी ११ वाजण्याचा सुमारास अल्पवयीन पीडिता संशयित शिंगाडे यांच्या घरामागून जात असताना संशयिताने अल्पवयीन पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे बोलून, तिचा पाठलाग करून, तिला रस्त्यामध्ये अडवून धमकी दिल्याची फिर्याद फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला देण्यात आलेले असून, गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस करीत आहेत.
No comments