Narendra Modi took oath as Prime Minister for the third consecutive time; Including 6 MPs from Maharashtra
गंधवार्ता वृतसेवा दि. ९ : नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. सलग तिसऱ्यांदा मोदी ३.० च्या पर्वाला सुरुवात झाली आहे. मी नरेंद्र दामोदर दास मोदी... असं म्हणत त्यांनी तिसऱ्यांदा गोपनियतेची शपथ घेतली. दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी देशभरातून आणि जगभरातून पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
|
नितीन गडकरी |
|
पियुष गोयल |
नरेंद्र मोदी 3.0 सरकार मध्ये महाराष्ट्रातील ६ खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, प्रतापराव जाधव, त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे यांचा समावेश आहे.
|
रामदास आठवले |
|
रक्षा खडसे |
दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी देशभरातून आणि जगभरातून पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील ७१ मंत्री शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ७२ वे मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मोदी ३.० कॅबिनेटमध्ये ३० कॅबिनेट मंत्री, ५ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्यमंत्री शपथ घेणार आहेत.
|
प्रतापराव जाधव |
|
मुरलीधर मोहोळ |
नरेंद्र मोदी यांनी गोपनियतेची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत एनडीएच्या काही दिग्गज नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यात राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, जेपी नड्डा, निर्मला सीतारामन, शिवराज सिंह चौहान यांचा समावेश आहे.
No comments