संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी सदर्न कमांडकडून आत्मनिर्भरतेवर एका चर्चासत्राचे आयोजन
पुणे (प्रतिनिधी) - पुण्यामध्ये लष्कराच्या दक्षिण विभागाच्या (सदर्न कमांड) प्रादेशिक तंत्रज्ञान केंद्राने “ स्वावलंबन से शक्तीः भारत की नयी दिशा” या विषयावर राजेंद्र सिंहजी आर्मी मेस अँड इन्स्टिट्यूट(RSAMI) येथे एका महत्त्वाच्या चर्चासत्राचे आयोजन केले. संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वयंपूर्णतेला चालना देणे या उद्देशाने आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या उपक्रमांशी सुसंगत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सशस्त्र दले, संरक्षण उद्योग आणि शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर भारतात एक भक्कम स्वयंपूर्ण संरक्षण उत्पादन क्षेत्र निर्माण करण्यासाठी धोरणे आणि सहकार्य यावर चर्चा करण्यासाठी या चर्चासत्रात एकत्र आले.
या चर्चासत्रातील प्रमुख वक्ते होते - ले. जनरल के. एस. ब्रार, AVSM, जनरल ऑफिसर कमांडिंग (GOC) दक्षिण भारत क्षेत्र, कर्नल आरएस भाटिया ( निवृत्त), अध्यक्ष डिफेन्स बिझनेस, कल्याणी समूह, लेफ्टनंट जनरल पीआर शंकर, PVSM, AVSM, VSM (निवृत्त), आयआयटी, मद्रास येथे प्राध्यापक, लेफ्टनंट जनरल व्हीजी पाटणकर, PVSM, UYSM, VSM (निवृत्त), श्री. किशोर दत्तअतलुरी, संस्थापक आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, झेन टेक्नॉलॉजीज, अभिषेक जैन, चीफ बिझनेस ऑफिसर, झूस न्यूमरिक्स, कमांडर रमेश माधवन (निवृत्त), सह-संस्थापक, तुंगा एरोस्पेस, कर्नल पी हनी (निवृत्त), संस्थापक आणि सीईओ, एज फोर्स सोल्युशन्स, प्रशांत गिरबाने, महासंचालक मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इडस्ट्रिज, अँड अग्रीकलचर, विंग कमांडर पी मधुसूदन(निवृत्त), उपाध्यक्ष (Aerospace & Defence) TIDCO), प्रो. जी जगदीश, प्रोफेसर ऑफ एरोस्पेस, एसएम वैद्य – माजी उपाध्यक्ष आणि बिझनेस हेड गोदरेज एरोस्पेस, लेफ्टनंट जनरल एसएस हसबनीस, PVSM, VSM (निवृत्त).भारतातील संरक्षण उत्पादनाला चालना देण्यावर परस्परसंवादात्मक तीन सत्रांच्या माध्यमातून या चर्चासत्रात भर देण्यात आला. उत्पादन प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी आणि संरक्षण क्षेत्रातील गुणवत्ता मानके सुधारण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांमध्ये सर्वोत्तम पद्धतींचे एकत्रीकरण करण्यावर चर्चा केंद्रित होती. नवोन्मेषाला चालना देण्यासाठी आणि संरक्षण उत्पादनाला पाठबळ देण्यासाठी गतिशील स्टार्टअप परिसंस्थेची जोपासना करण्यावर यामध्ये भर देण्यात आला. संरक्षण उत्पादन केंद्रे स्थापन करणे, प्रादेशिक औद्योगिक केंद्रांना चालना देणे आणि संरक्षण सेवा, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील ज्ञान हस्तांतरण आणि सहकार्य सुलभ करणे यावर मुख्य भर देण्यात आला.
सदर्न कमांडचे, प्रमुख तसेच जनरल ऑफिसर कमांडिग इन चीफ लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग (PVSM, AVSM, YSM, SM, VSM) या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी भारतात एका भक्कम, स्वयंपूर्ण संरक्षण क्षेत्राची गरज अधोरेखित केली. या चर्चासत्रात सहभागी झालेल्या सर्वांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनाद्वारे राष्ट्रीय सुरक्षेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सहकार्यात्मक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित केले. संरक्षण उत्पादनात भारत जागतिक नेता म्हणून उभा राहील अशा भविष्यासाठी उद्दिष्ट असलेल्या आत्मनिर्भर भारत मोहिमेप्रति असलेल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार त्यांनी त्यांच्या संबोधनात केला. या चर्चासत्रात भारतातील संरक्षण उत्पादकांचा शोध घेता यावा यासाठी सदर्न कमांड आणि राज्यातील उत्पादन संस्था यांच्या सहकार्याने सदर्न स्टार डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स डिरेक्टरीच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन देखील करण्यात आले. संरक्षण उत्पादनात भारताच्या स्वयंपूर्णतेमध्ये योगदान देणाऱ्या उपक्रमांना पाठबळ देण्यासाठी सदर्न कमांड मुख्यालयाची वचनबद्धता या चर्चासत्राने अधोरेखित केली. देशाला आपली संरक्षण धोरणात्मक संरक्षण उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने नेण्यासाठी भागधारकांमध्ये भागीदारी आणि युती करण्यासाठी हे एक व्यासपीठ होते.
No comments