Breaking News

निंबुत येथे झालेल्या गोळीबारातील रणजीत निंबाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू

Ranjit Nimbalkar of Nimbut firing died during treatment

    फलटण (गंधवार्ता फलटण) दि.२९ - बारामती तालुक्याताल सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी निंबुत येथे बैलाच्या व्यवहारा वरून तावडी ता. फलटण येथील रणजीत निंबाळकर यांच्यावर गुरुवारी गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या गोळीबारात निंबाळकर गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान निंबाळकर यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काकडे बंधुंसह अन्य तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

    बैलगाडा शर्यतीतील ट्रिपल महाराष्ट्र हिंद केसरी गौतम काकडे यांच्या घरी हा गोळीबार झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, बैलाच्या व्यवहारावरून निंबाळकर आणि काकडे यांच्यात वाद झाला. काकडे यांनी खरेदी केलेला बैल निंबाळकर हे पुन्हा मागत होते. यावेळी काकडे आणि निंबाळकर यांच्यामध्ये शाब्दीक चकमक होऊन वाद झाला. या वादातून गोळीबाराची घटना घडली होती.

No comments