फलटण तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी बापुराव गावडे यांची फेरनिवड
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) - गरीब व गरजू घटकांना न्याय मिळवून देणारी समिती म्हणून ज्या समितीचा उल्लेख केला जातो अशा फलटण तालुका संजय गांधी स्वावलंबन व निराधार समितीच्या अध्यक्षपदी खटकेवस्तीचे सरपंच तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे विश्वासू तथा खटकेवस्ती ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच बापूराव दत्तात्रय गावडे यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
या समितीवर हेमंत सुतार, सुखदेव फुले, राजेंद्र काकडे, दिलीप अडसूळ, दत्तात्रय गुंजवटे, व काशिनाथ शिंदे त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ही समिती गठित करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या शिफारसीनुसार ही समिती गठीत करण्यात आली आहे. सर्व समिती सदस्य व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण तालुक्याचे आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी बापूराव गावडे यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले.
संजय गांधी निराधार व अनुदान या समितीच्या माध्यमातून तालुक्यातील दिव्यांग मुलांना निराधार, विधवा, घटस्फोटीत महिलांना मदत मिळवून देण्यासाठी बापूराव गावडे सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या एकंदरीत कामकाज अनुभवावरून त्यांची अध्यक्षपदी फेर नियुक्ती करण्यात आली आहे.
No comments