पावसाळ्यात रस्त्याच्या डांबरीकरणाचे कामे बंद ठेवावी - मागणी
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१२ - पावसाळ्यात रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम बंद ठेवण्यात यावे अशी मागणी कामगार संघर्ष संघटना व आझाद समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन प्रांताधिकारी सचिन ढोले यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले याप्रसंगी कामगार संघटनेचे अध्यक्ष सनी काकडे, आप्पा गायकवाड, आमर झेंडे, सुरज भैलुमे, सिद्धार्थ अहिवळे, जय माने,
रोहित अहिवळे, सुरज अहिवळे उपस्थित होते.
प्रांत अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की,सध्या जुन महिना चालू असून, पावसाचे दिवस चालू आहे आणी पावसात, डांबरी कारणाच्या कामाला मजबूती येते नाही, राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्या मार्फरत नागरिकांचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी वेगवेगळ्या योजनेतून अनेक डांबरीकरणांची कामे चालू आहेत. परंतु पावसाळ्यात पाहिजे अशी मजबूती येऊ शकत नाही, त्यामुळे फलटण सातारा रस्त्यावर होत असलेले डांबरीकारणाचे काम तसेच शासकीय कार्यालयाच्या अधीन येणारे डांबरीकरणाची कामे बंद करण्याचे आदेश देण्यात यावे.
No comments