फलटण परिसरात समाधानकारक पाऊस
फलटण दि. ९ : फलटणच्या अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, ओढ्यांना पाणी आले आहे. तालुक्यात जवळ जवळ सर्वच भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नीरा उजवा कालवा विभागात आज रविवार दि. ९ जून रोजी सकाळी संपलेल्या २४ तासात झालेला पाऊस खालीलप्रमाणे -
भाटघर ६३ मि. मी., नीरा - देवघर ५४ मि. मी., वीर ५२ मि. मी., गुंजवणी २७ मि. मी. फलटण ७५ मि. मी., निंबळक ६३ मि. मी., धर्मपुरी ९२ मि. मी., नातेपुते ५५ मि. मी., माळशिरस ६६ मि. मी.
भाटघर आजचा पाणी साठा १.४३ टीएमसी ६.०६ टक्के, गतवर्षी या तारखेला १.४० टीएमसी ५.९८ टक्के.
नीरा - देवघर आजचा पाणी साठा ०.९७ टीएमसी ८.३२ टक्के, गतवर्षी या तारखेला १.०८ टीएमसी ९.२२ टक्के.
वीर आजचा पाणी साठा १.८३ टीएमसी १९.४० टक्के, गतवर्षी या तारखेला २.१९ टीएमसी २३.३७ टक्के.
गुंजवणी आजचा पाणी साठा ०.४९ टीएमसी १३.३० टक्के, गतवर्षी या तारखेला ०.६४ टीएमसी १७.३४ टक्के.
No comments