अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्ज करावेत
सातारा दि. 14: अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे कौशल्य व ज्ञान उपलब्ध व्हावे व त्यांची विविध क्षेत्रात होणाऱ्या स्पर्धात्मक युगासाठी जडण-घडण व्हावी याकरिता देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.
सन 2024-2025 या वर्षाकरिता अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्या येत आहेत. अर्जाचा नमुना व सर्व आवश्यक माहिती महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक-12 जुलै आहे.
सदर संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह दिनांक-12 जुलै 2024 पूर्वी समक्ष अथवा पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे 411001 येथे सादर करावयाचा आहे.सन 2024-2025 या वर्षात राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती या योजनेंतर्गत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत.
No comments