Breaking News

सातारा जिल्ह्यातील शिंपी समाजाची श्री संत नामदेव घुमान यात्रा उत्साहात संपन्न

Sri Sant Namdev Ghuman Yatra of Shimpi Samaj of Satara district was completed with enthusiasm

     फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.११ -  सातारा जिल्ह्यातील शिंपी समाज बंधू भगिनींची घुमान,वैष्णोदेवी, अमृतसर ही यात्रा ना स प च्या वतीने आयोजित करण्यात आली होती, यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. संत नामदेव यात्रा अत्यंत उत्साही व आनंदी वातावरणात संपन्न झाली.

     ना स प चे राज्य अध्यक्ष संजय नेवासकर, सातारा जिल्हा ना स प चे अध्यक्ष सुनील पोरे, जेष्ठ विधिज्ञ ॲड.विश्वनाथ टाळकुटे, जेष्ठ पत्रकार व श्रीहरी टूर्स चे सुभाष भांबुरे  या सर्वांच्या सहकार्यातून या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यास समाज बांधवांनी भरभरून प्रतिसाद दिला.

        घुमान(पंजाब)येथे बाबा भगत नामदेव कमिटी गुरुद्वाराचे सर्व संचालक यांचा सत्कार जिल्हा ना स प च्या वतीने सुनील पोरे यांच्या हस्ते करण्यात आला. तर गुरुद्वारा कमिटीच्या वतीने सुनील पोरे,सुवर्णा पोरे,पत्रकार व श्रीहरी टूर्स चे सुभाष भांबुरे,वाईचे ना स प चे अध्यक्ष डॉ.मकरंद पोरे,फलटण ना स प चे उपाध्यक्ष श्रीकांत मुळे, पाटण ना स प चे श्रीकांत फुटाणे,म्हसवड येथील महिला मंडळाच्या सौ. सुवर्णा पोरे,फलटण च्या महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पद्मा टाळकुटे यांच्यासह अनेक मान्यवरांचा गुरुद्वारा कमिटीच्या वतीने पंजाब येथील संत नामदेव महाराजांची प्रतिमा व शाल देऊन करण्यात आला. यावेळी अध्यक्ष तरसेमसिंह बावा,जनरल सेक्रेटरी सुखजिंदर सिंह बावा, सेक्रेटरी मनजिंदर सिंह बावा ,  संयुक्त सचिव एवं प्रेस सचिव सरबजीत सिंह बावा,ऑडिटर संतोख सिंह बावा व घुमान येथील इतर मान्यवर उपस्थित होते.                

    घुमान(पंजाब)येथील गुरुद्वारा कमिटीच्या सांस्कृतिक सभागृहात  यावेळी फलटण येथील संत नामदेव महाराज महिला मंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक मिळवलेली संत नामदेव चरित्र मांडणारी नाटिका सादर करण्यात आली, या मध्ये रेखा हेंद्रे,पद्मा टाळकुटे,भारती कुमठेकर, माधुरी हेंद्रे,सारिका माळवदे  यांनी सहभाग घेतला होता.गुरुद्वारा कमिटीच्या वतीने यांचे विशेष कौतुक करण्यात आले व उपस्थित प्रेक्षकांनीही भरभरून कौतुक केले.

       कार्यक्रमास प्रमोद पोरे,करण पोरे,अनिल वेल्हाळ,संजय हेंद्रे,दिगंबर कुमठेकर, मुकुंद कुमठेकर, डॉ राजेंद्र हेंद्रे,भडंगे, प्रकाश टाळकुटे, राकेश लंगरकर, विजय चांडवले, अशोक भांबुरे, प्रकाश भांबुरे,रोहन वेल्हाळ यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता

       यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनील पोरे यांच्यासह अनेक मान्यवरांची समयोचित भाषणे झाली प्रास्तविक आणि सूत्रसंचालन पत्रकार व श्रीहरी टूर्स चे सुभाष भांबुरे यांनी केले.

No comments