श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल सीबीएसई मध्ये पर्यावरण सप्ताह संपन्न
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१४ - 'जागतिक पर्यावरण दिनाचे' औचित्य साधून दिनांक ६ जून २०२४ ते दिनांक १२ जून २०२४ या कालावधीमध्ये उन्हाळी शिबिरा अंतर्गत पर्यावरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याद्वारे पर्यावरणपूरक उपक्रमांद्वारे प्रशालेतील विद्यार्थ्यांच्याद्वारे जैविक खत व उत्पादने यांची निर्मिती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रशालेमध्ये शालेय परसबागेची निर्मिती केली असून, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती करण्यात आली. तसेच प्लास्टिक मुक्त उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
ऊर्जेचा योग्य वापर व पाण्याचे नियोजन व महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सुखकर्ता एनजीओ याद्वारे मुक्त गाई संगोपन व निगा याद्वारे विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करून, प्लास्टिकचा जनावरांवर होणारा विपरीत परिणाम याबाबत सतर्क राहण्याबाबत आवाहन करण्यात आले. पर्यावरणाचे महत्त्व सांगणारे चित्ररूप भित्तिपत्रके विद्यार्थ्यांनी रेखाटली.
या उपक्रमास विद्यार्थ्यांबरोबरच प्रशालेतील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी देखील सहभाग घेतला होता, उन्हाळी शिबिरा अंतर्गत घेण्यात आलेल्या 'पर्यावरण सप्ताह' तसेच इतर उपक्रमास प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. दिक्षीत मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments