Breaking News

फलटण आगारा मार्फत विद्यार्थ्यांना एस.टी. पास विद्यालयातच उपलब्ध

ST students through Phaltan Agra. Pass available in school only

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२४ - राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मा. डॉ. माधव कुसेकर यांच्या आवाहनानुसार एस.टी. महामंडळाने विद्यार्थ्यांना प्रवासासाठी विद्यालयातच पास उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली आहे. त्यानुसार राज्य परिवहन फलटण आगाराने मुधोजी महाविद्यालय  व वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना पास उपलब्ध करून दिले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतच पास मिळाल्याने त्यांच्या वेळेची सुद्धा बचत झाली व बस स्थानकावर पासेस करिता रांगेत वाट पाहण्या पासून सुटका झाली. विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी फलटण आगाराच्या उपक्रमाबद्दल धन्यवाद व्यक्त केले.

    फलटण आगाराच्या नूतन आगार व्यवस्थापिका सैफिया मुल्ला व मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. एच. कदम यांच्या हस्ते पास वितरण योजनेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी फलटण आगाराच सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक रोहित नाईक, स्थानक प्रमुख राहुल वाघमोडे तसेच भोसले सर, मोहिते सर उपस्थित  होते.

No comments