दुचाकी घसरून युवक ट्रकखाली ; एक जखमी एक ठार
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.27 - जिंती नाका, फलटण येथे ट्रकच्या डावीकडुन ओव्हरटेक करीत असताना, दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात युवक ठार झाला असून, दुसरा युवक जखमी झाला आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २६/६/२०२४ रोजी दुपारी ३.०० वाजण्याच्या सुमारास महादेव मंदीराजवळ जिंती नाका फलटण येथे पुणे येथुन लोणंद - फलटण रस्त्याने फलटण बाजुकडे जात असताना कृष्णा रमेश सुळ, वय -१९ वर्षे रा मोरोची, ता. माळसिरस, जि सोलापुर व अभिजीत महादेव करचे वय -१९ वर्षे (मयत) रा पिंपरी ता माळशिरस जि सोलापुर हे दोघे युवक दुचाकीवरून ट्रकच्या डावीकडुन ओव्हरटेक करीत असताना, मोटारसायकल घसरुन झालेल्या अपघातात अभिजीत करचे हा मयत झाला आहे. तर कृष्णा सुळ किरकोऴ जखमी झाला. पोलीस उपनिरीक्षक सूरज शिंदे हे करीत आहेत.
No comments