३९ हजार रुपयांच्या रोख रक्कमेसह दुचाकी वाहनास अडकवलेली पर्स गेली चोरीला
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.११ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील किराणा माला दुकानाच्या समोर लावलेल्या गाडीस अडकवलेली पर्स, ज्यामध्ये ३९ हजार रुपयांची रोख रक्कम व बँक ऑफ इंडिया शाखा फलटणचे पासबुक होते ती अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी दत्तू नाळे वय 75 वर्षे रा. वनदेवशेरी कोळकी फलटण यांनी दि.१ जून २०२४ रोजी ११.३५ ते ११.५० वाजण्याच्या दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक फलटण येथील संतोष वसंतलाल दोशी यांचे किराणा मालाचे दुकानासमोर रोडवर होंडा सी डी १०० मोटार सायकल क्रमांक एम एच ११ क्यू ६८५० ही लॉक करून ठेवलेली आणि तिला अडकवलेल्या निळे रंगाची पर्समध्ये ३९ हजार रुपये रोख रक्कम व बँक पासबुक होते. या संधीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने रोख रक्कम असलेली पर्स चोरून असल्याची फिर्याद आज दि.११/६/२०२४ रोजी शिवाजी नाळे यांनी दिली आहे अधिक तपास महिला पोलीस पोलीस नाईक पूनम बोबडे या करीत आहेत.
No comments