बँक ऑफ इंडिया फलटण शाखेतुन पोलीस पाटलाचे ४१ हजार रुपये लंपास
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ - बँक ऑफ इंडियाच्या फलटण शाखेमध्ये पैसे भरण्यासाठी रांगेत उभ्या असणाऱ्या पोलीस पाटलाच्या पाठीवर असलेली बॅग कापून बागेतील ४१ हजार रुपये लंपास केल्याप्रकरणी आज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, १८/७/२०२४ रोजी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास, दयानंद नारायण चव्हाण वय ४३ वर्ष, व्यवसाय - पोलीस पाटील, रा. शेरेचीवडी (ढवळ) ता. फलटण हे, लक्ष्मीनगर फलटण येथे बँक ऑफ इंडियामध्ये पैसे भरण्यासाठी आले होते. चव्हाण हे पैसे भरण्याच्या काउंटर समोर रांगेत उभे असताना, अज्ञात चोरट्याने पाठीवर अडकवलेली बॅग कशानेतरी कापून त्यामधील ४१ हजार रुपयांचा रोख रक्कमेचा बंडल चोरून नेला असल्याची फिर्याद दयानंद नारायण चव्हाण यांनी दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक पुनम बोबडे या करीत आहेत.
No comments