Breaking News

आ. श्रीमंत रामराजे व आ. दीपक चव्हाण यांच्या प्रयत्नातून अर्थसंकल्पात फलटणसाठी ६८ कोटी ३५ लाख मंजूर - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

68 crore 35 lakhs approved for Faltan in the budget due to the efforts of Shrimant Ramraje and Deepak Chavan - Shrimant Sanjivraje

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१४ -  महाराष्ट्र राज्याच्या २०२४ - २५ च्या नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात आ. श्रीमंत रामराजे नाईक- निंबाळकर व आ. दीपक चव्हाण यांच्या मागणीनुसार सुमारे ६८ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

    या मंजूर निधीतून खालील कामे करायची आहेत. १) प्रजिमा ९ पैकी २९ ते ३२ कि. मी. मधील फडतरवाडी ते जिंती या भागाची सुधारणा करणे २ कोटी ५० लाख रुपये, २)प्रजिमा ९ पैकी ३ ते ६ कि. मी. मधील शिवेचा मळा ते सासवड रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे २ कोटी ५० लाख रुपये, ३) ग्रा मा १३८ हणमंतवाडीजवळ लहान पुलाचे बांधकाम करणे २ कोटी ७५लाख रुपये, ४) प्रजिमा ८ मध्ये कि.मी. ८/५०० कॅनॉल वर पुलाचे बांधकाम करणे, ५ कोटी रुपये, ५) प्रजिमा १३ पवारवाडी ते हणमंतवाडी रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे ५ कोटी रुपये, ६) प्रजिमा ७ लंगुटेवस्ती ते बरड आणि टाकळवाडे ते राजाळे रस्ता सुधारणा करणे ५ कोटी रुपये, ७) प्रजिमा ९ कि. मी. क्रमांक ३७/०० नीरा नदीवरील मोठ्या पुलाचे जोड रस्त्यांसह बांधकाम करणे आणि प्रजिमा ९ ते प्रजिमा ७३ पुणे जिल्हा जोड रस्त्यांसह खाजगी क्षेत्रासह भूसंपादन करणे ४५ कोटी ६० लाख रुपये.

No comments