डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबाना करण्याचा प्रयत्न केलेल्या माथेफिरूवर UAPA कायदा अंतर्गत कारवाई करावी - संविधान समर्थन मोर्चा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबाना करण्याचा प्रयत्न केलेल्या माथेफिरूवर UAPA कायदा अंतर्गत कारवाई करण्यात यावी व फलटणमध्ये असणाऱ्या सर्व महापुरूषांच्या पुतळ्यांना पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून संरक्षण देणेत यावे अशी मागणी संविधान समर्थन मोर्चाच्या वतीने प्रांताधिकारी सचिन ढोले यांना निवेदन देऊन करण्यात आली. दरम्यान निवेदन घेतल्यानंतर प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी, संविधान समर्थन मोर्चाच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्यात येईल व त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात येईल असे सांगितले.
संविधान समर्थन मोर्च्याच्या वतीने प्रांताधिकारी सचिन ढोले यांना देण्यात आलेले निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, दि.२१/०७/२०२४ रोजी बहुजनांचे आधारस्थान असणारे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबाना करण्याचा एका माथेफिरूने प्रयत्न केला होता, परंतू जागृत भिमसैनिकांमुळे त्याचा डाव फसला, कायदा हातात न घेता त्या आरोपीला तात्काळ पोलीस प्रशासनाचे हवाली केले. त्यावर UAPA कायदा अंतर्गत कारवाई करण्यात यावी व फलटणमध्ये असणाऱ्या सर्व महापुरूषांच्या पुतळ्यांना कायम स्वरूपी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून संरक्षण देणेत यावे ही नम्र विनंती.
निवेदनावर माजी नगरसेवक सचिन अहिवळे, सुधीर अहिवळे, पत्रकार प्रा.रमेश आढाव, सचिन मोरे, शक्ती भोसले, विजय येवले, सनी काकडे, नंदकुमार मोरे, संजय गायकवाड, सनी मोरे, अभिलाष काकडे, विकी काकडे, सागर अहिवळे, शाम अहिवळे, निलेश मोरे, शिवा अहिवळे, दया पडकर आदींच्या सह्या आहेत.
No comments