Breaking News

ग्रामीण रुग्णालया जवळ कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करण्याच्या प्रयत्न

Attempts to forcefully steal near rural hospitals by showing fear of koyata

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.४ - फलटण गिरवी रस्त्यावर बंद पडलेले ग्रामीण रुग्णालया जवळ भरदिवसा एकास अडवून कोयत्याचा धाक दाखवून, मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न  केल्यामुळे चार अनोळखी इसमांच्या विरोधात जबरी चोरी करण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 02/07/2024 रोजी दुपारी 4:45 वाजण्याच्या सुमारास, सचिन गणपत मोरे, वय 36 वर्षे, रा. झिरपवाडी, ता. फलटण हे फलटण बाजूकडून गिरवी रस्त्याने जात असताना, बंद पडलेल्या सरकारी ग्रामीण रुग्णालया शेजारी, झिरपवाडी गावच्या हद्दीत अनोळखी चार इसमानी सचिन मोरे यांना अडवून, कोयत्याचा धाक दाखवून, सचिन मोरे यांचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला असल्याची फिर्याद सचिन गणपत मोरे यांनी दिली आहे. या अनुषंगाने भारतीय न्याय संहिता कलमाच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार कदम हे करीत आहेत.

No comments