फलटण वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड. बापूसाहेब सरक तर उपाध्यक्षपदी अॅड. मयुरी शहा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ - फलटण वकील संघाच्या सन २०२४-२५ वर्षीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅड. बापूसाहेब बाबासाहेब सरक तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अॅड. मयुरी चैतन्य शहा या विजयी झाल्या तर उर्वरित पदाधिकार्यांच्या निवडी या बिनविरोध करण्यात आल्या. विजयी उमेदवारांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
फलटण वकील संघाच्या सन २०२४-२५ यावर्षीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अॅड. बापूसाहेब सरक व अॅड. अभिजीत यादव हे उमेदवार निवडणुक रिंगणात होते. दोघांमध्ये झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत अॅड. बापूसाहेब सरक हे विजयी झाले. तर अॅड. मयुरी शहा व अॅड. मेघा अहिवळे या उपाध्यक्ष पदासाठी निवडणुक रिंगणात होत्या. त्यामध्ये अॅड. मयुरी शहा या विजयी झाल्या. तर सचिव अॅड. सुरज सोनवलकर, खजिनदार अॅड. प्रशांत साठे, सहसचिव अॅड.विशाल मोहिते , सदस्य अॅड.अनिल कुंभार व अॅड. मयूर भोसले या पदाधिकार्यांच्या निवडी या बिनविरोध करण्यात आल्या.
फलटण वकील संघाच्या निवडणुकीमध्ये निवडणुक निर्वाचन अधिकारी म्हणुन अॅड. आर.ए. यादव अॅड. गणेश तावरे व अॅड. राहुल सतुटे यांनी कामकाज पाहिले.
No comments