मुधोजी महाविद्यालय येथे बापूसाहेब महाराज यांची जयंती साजरी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० - फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालय,फलटण येथे श्रीमंत प्रतापसिंह नाईक निंबाळकर महाराज उर्फ बापूसाहेब महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्राचार्य प्रो.डॉ.पंढरीनाथ कदम यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना इतिहास विभाग विशेष दिन समितीचे चेअरमन डॉ.संतोष कदम म्हणाले,श्रीमंत प्रतापसिंह महाराज हे फलटण संस्थानाचे अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर महाराजसाहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव, ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराजसाहेब यांचे वडील होते.श्रीमंत प्रतापसिंह महाराज यांना सर्व लोक बापूसाहेब महाराज या नावाने ओळखत होते.
श्रीमंत प्रतापसिंह महाराज हे गोविंद काका उपळेकर महाराजांचे भक्त होते.त्यांनी काकांच्या ट्रस्टला फार मोठी देणगी दिली.त्या ट्रस्टचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.तसेच त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय,सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले.श्रीमंत प्रतापसिंह महाराज अतिशय कडक शिस्तीचे व वक्तशीर होते.त्यांचा मनमोकळा स्वभाव फलटणसाठी आपलेपणाचा व माणुसकीचा होता.अशा थोर श्रीमंत प्रतापसिंह महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुधोजी कॉलेजमधील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. शेवटी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप झाला.
No comments