लक्ष्मीनगर फलटण येथे घरफोडी ; ५३ हजार रुपयांचा ऐवज लंपास
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ - लक्ष्मी नगर फलटण येथे राहत्या घरातील डायनिंग हॉलच्या खिडकीची ग्रील कापून, घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने घरफोडी करत, घरातील सोन्याचे मंगळसूत्र व रोख रक्कम असा एकूण ५३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन कृष्णाजी घाडगे यांच्या रघुकुंज, लक्ष्मीनगर, फलटण येथील राहत्या घरी दि. 01/07/2024 रोजी रात्रौ 02.00 ते सकाळी 06.30 वा. चे दरम्यान अध्यात चोरट्याने घरफोडी केली. अज्ञात चोरट्याने राहत्या घराच्या डायनिंग हॉलच्या खिडकीचे लोखंडी ग्रिल कापुन, घरात प्रवेश केला व डायनिंग रुममध्ये लाकडी कपाटात ठेवलेले १२ ग्रॅम ५५० मिली वजनाचे सोन्याचे मनीमंगळसुत्र व डायनिंग रुममध्ये खुर्चीवर ठेवलेली पर्स मधील साडेतीन हजार रुपये रोख रक्कम असे एकुण ५३ हजार ३०० रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे.
याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फलटण शहर पोलीस स्टेशनला, नवीन कायदा भारतीय न्याय संहिता कलम कलम 305(अ), 331(4) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पूनम बोडके या करीत आहेत.
No comments