कत्तलीसाठी चालवलेल्या म्हैशी पकडल्या : १० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
फलटण (गंधर्वता वृत्तसेवा) - दि.१७ - बरड ता. फलटण गावचे हद्दीत, महिंद्रा पिकअप मध्ये ५ व अशोक लेलंड या चारचाकीतून ४ म्हैशी, त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था न करता, कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना पोलिसांनी पकडले असून, एकूण १० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.१६/७/२०२४ रोजी ८.३० वाजण्याच्या सुमारास मौजे बरड ता. फलटण गावचे हद्यीत एस.टी. स्टॅन्ड येथील नातेपुते ते फलटण जाणारे रोडवर ईसम नामे प्रविण रामचंद्र रणदिवे वय २४ वर्षे, रा. तावशी ता. पंढरपुर जि. सोलापुर, याने त्याच्या ताब्यातील पिकअप वाहण क्रमांक एम.एच.१३ सी.जे. ०८४४ मध्ये ५ म्हैशी व ईसम महादेव सिद्राम पवार वय ५२ वर्षे, रा. वेळापुर, ता. माळशिरस जि. सोलापुर. याने त्याचे ताब्यातील अशोक लेलंन्ड वाहण क्रमांक एम.एच. ४५ ए.एफ. ४९९१ या वाहणामध्ये ४ म्हैशी कत्तलीसाठी घेवुन जात असताना, त्यांची कत्तली पुर्वीची वैद्यकीय तपासणी न करता व त्यांची चारा पाण्याची कोणतीही सोय न करता घेवुन जात असताना मिळून आले आहेत.
दोघांच्या विरुध्द प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम व महाराष्ट्र पशु सरंक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५ लाख रुपये किमतीची महिंद्रा पिकप व ६ लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड ही चारचाकी वाहने जप्त केली असून, प्रत्येकी दहा हजार रुपये किमतीच्या नऊ म्हैशी असा एकूण १० लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.अधिक तपास फौजदार मठपती हे करीत आहेत.
No comments