कोळकी येथे घरफोडी - ६ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मालोजीनगर कोळकी, ता.फलटण येथे बंद घराच्या खिडकीची लोखंडी जाळी काढुन घरात प्रवेश करून घरफोडी केली. यामध्ये ६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 23/06/2024 रोजी सायंकाळी 5.00 वाजता ते दि. 06/07/2024 रोजीच्या सायंकाळी 6.00 वाजण्याच्या दरम्यान, भरत भाऊसो राऊत यांच्या मालोजीनगर कोळकी, ता.फलटण येथील, बंद घराच्या खिडकीची लोखंडी जाळी काढुन, अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरफोडी केली. व घरातील 1) ५ हजार रुपये किंमताचा व्हिडिओकॉन कंपनीचा 20 इंची एल. ए. डी. टी.व्ही. 2) 1500/- रु किंमतीचे काळे रंगाचे केक फेटण्याचे बिटर मशीन असा एकूण 6500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला असल्याची फिर्याद भरत भाऊसो राऊत यांनी दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक तांबे या करीत आहेत.
No comments