मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फलटण तालुकास्तरीय आढावा समिती जाहीर ; अध्यक्षपदी दीपक चव्हाण तर नानासाहेब इवरे व उषा राऊत यांची सदस्य पदी निवड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ - राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" ही योजना सुरु करण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजनेची देखरेख व संनियंत्रण करणे, सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबत नियमित आढावा घेणे, सदर योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे, ग्रामीण स्तरावर प्राप्त झालेल्या अजांची छाननी करणे/तपासणी करणे, सदर अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करणे याकरीता पालकमंत्री महोदय, सातारा यांच्या शिफारशीच्या आदेशान्वये सातारा जिल्हयातील फलटण तालुक्याकरीता खालीलप्रमाणे "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तालुकास्तरीय आढावा समिती" गठीत करण्यात आली आहे.
या समितीचे अध्यक्षपदी आमदार दिपकराव चव्हाण तर सचिवपदी फलटण तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सहायक आयुक्त/सहायक अधिकारी समाज कल्याण, सातारा/समाज विकास अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण)(ज्येष्ठतम), फलटण तालुका एक अंगणवाडी पर्यवेक्षिका (बा.वि.प्र.अ. यांच्या मान्यतेने), संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) फलटण तालुका यांची शासकीय सदस्य पदी नियुक्ती करण्यात आल्या आहे तर श्री. नानासो पोपट इवरे, श्रीमती उषा लालासो राऊत यांची अशासकीय सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.
या समितीने शासन निर्णयातील तरतुदींचे पालन करुन "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण " या योजनेची सातारा जिल्हामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात करावी. तसेच शासन निर्णयामधील मार्गदर्शक सूचनांनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तालुकास्तरीय आढावा समितीची बैठक घेऊन अंतिम पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द करावी, त्यानुसार तालुकास्तरीय समितीने पुढील कार्यवाहीसाठी अंतिम पात्र यादी जिल्हास्तरीय समितीस सादर करावी. तसेच कोणतीही पात्र लाभार्थी महिला सदर योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहणार नाही याबाबतची दक्षता घेण्यात यावी असे आदेश सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी काढले आहेत.
No comments