शहर उपजीविका केंद्राच्या सेवांचा लाभ नागरिकांनी घ्यावा - मुख्याधिकारी निखिल मोरे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ - शहर उपजीविका केंद्राच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता बचत गटांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार असून, फलटण शहरातील असंघटित कामगारांची नोंदणी करून, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगून, शहर उपजीविका केंद्राच्या सेवांचा लाभ हेल्पलाईनच्या माध्यमांतून शहरातील सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले.
शुक्रवार दिनांक २६/७/२०२४ रोजी दीन दयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सोनचिरैय्या शहर उपजीविका केंद्राचे उद्घाटन फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मोहनकुमार शिंदे, व्यवस्थापक (DAY-NULM) यांनी केले व शशिकांत शिरतोडे, व्यवस्थापक (DAY-NULM) यांनी शहर उपजीविका केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवा व कार्यपद्धतीबद्दल महिलांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी फलटण नगरपरिषदेच्या साळुंखे मॅडम (विद्युत अभियंता), साधना पवार मॅडम (आस्थापना), प्रकाश तुळसे (ऐसाय, आरोग्य) व मुश्ताक महात साहेब उपस्थित होते. तसेच शिला घाडगे,व्यवस्थापक, ओमसाई लोकसंचलीत साधन केंद्र फलटण (माविम), मालन गोडसे,अध्यक्षा,आत्मनिर्भर शहर स्तर संघ, फलटण, विद्या रिठे व सुप्रिया फडतरे (NULM सहयोगीनी) व वस्तीस्तर संघाच्या अध्यक्ष- सचिव, सीआरपी व स्वयं सहाय्यता बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
No comments