विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित ११ सदस्यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शपथ दिली
मुंबई, दि.28 : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शपथ दिली. यामध्ये पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, भावना गवळी, कृपाल तुमाने, योगेश टिळेकर, डॉ. प्रज्ञा सातव, शिवाजीराव गर्जे, अमित गोरखे, मिलिंद नार्वेकर, राजेश विटेकर या 11 सदस्यांनी शपथ घेतली.
विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सर्व नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
No comments