Breaking News

ग्रामविकास प्रतिष्ठानचे प्रबोधनात्मक कार्य, यशस्वितांचा गुणगौरव प्रेरणादायी - सौ.भाग्यश्री फरांदे

Enlightenment work of Gram Vikas Pratishthan, praise of success is inspiring - Mrs. Bhagyashree Pharande

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१४ - दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या संत गाडगेबाबा व्याख्यानमालेचा सातत्यपूर्ण असणारा प्रबोधनात्मक कार्य, यशस्वितांचा गुणगौरव  प्रेरणादायी असल्याचे सातारच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सौ.भाग्यश्री फरांदे यांनी स्पष्ट केले.

    दुधेबावी ता. फलटण येथील ग्रामविकास प्रतिष्ठानच्या संत गाडगेबाबा व्याख्यानमालेत यूपीएससी, एमपीएससी परीक्षेतील यशस्वीतांना राज्यस्तरीय यशवंत पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या.   यावेळी सातारा विभागीय वन अधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे, चांडाळ चौकडीच्या करामती, भुंडीस चित्रपट फेम अभिनेते रामभाऊ जगताप,उपविभागीय कृषी अधिकारी सुहास रणसिंग, मंडल कृषी अधिकारी शहाजी शिंदे,पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हणमंतराव सोनवलकर, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय दडस यांची प्रमुख उपस्थिती होती.

    सौ.भाग्यश्री फरांदे पुढे म्हणाल्या गावागावातून व्याख्यानमाला झाल्यास निश्चितपणे सकारात्मक परिवर्तन होईल, माणूस म्हणून एकत्र राहण्याचे काम व्याख्यानमाला करत असतात. मोबाईल मुळे वैचारिक गुलामगिरी वाढत असून व्याख्यानमालामुळे वैचारिक प्रगतीत वृद्धी होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. सातत्यपूर्ण 24 वर्ष व्याख्यानमाला,गुणगौरव समारंभ आयोजित करणे ही निश्चितपणे अभिमानाची बाब आहे.गुणगौरव केल्याने ग्रामीण भागातील युवक युवतींना प्रेरणा मिळत असल्याचे सौ.  फरांदे यांनी स्पष्ट केले.

    यावेळी यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेले ओंकार राजेंद्र गुंडगे(I.A.S.), योगेश बाळासाहेब  बोरकर (I.F.S.), एमपीएससी परीक्षेतून यशस्वी झालेले कु.सोनल रमेश सूर्यवंशी (उपजिल्हाधिकारी ), कु.अनुराधा भानुदास गावडे (कृषी उपसंचालक), रमेश उद्धव चव्हाण (शिक्षणाधिकारी), अनिस मुसा गायकवाड (शिक्षणा धिकारी), सुधीर हनुमंत महामुनी (शिक्षणाधिकारी), अमित लक्ष्मण बोराटे (सहाय्यक गटविकास अधिकारी), कु.अमृता रामभाऊ ढेकळे (सहाय्यक कक्ष अधिकारी तथा राज्यकर निरीक्षक), कु.दिपाली शिवाजी राजगे (रचना सहाय्यक ), दीपक राजेंद्र बोराटे (एलआयसी डेव्हलपमेंट ऑफिसर), आकाश सिद्धेश्वर पुस्तके (कनिष्ठ अभियंता जि. प. सातारा ), कु. गौरी विवेक स्वामी (कनिष्ठ अभियंता स्थापत्य), विठ्ठल किसन कोळेकर  ( कनिष्ठ अभियंता) कु.तृप्ती हनुमंतराव लकडे (सहाय्यक  अभियंता, जलसंपदा ), अभिजीत नामदेव वायसे ( कनिष्ठ अभियंता जलसंपदा ), प्रशांत विलासराव देवकाते (तांत्रिक सहाय्यक सार्वजनिक बांधकाम), सुजित हनुमंतराव सोनवलकर (तांत्रिक सहाय्यक सार्वजनिक बांधकाम), संग्राम गजानन मोरे (केंद्रीय पीएसआय ) स्वप्निल हनुमंत चोपडे (पीएसआय ), सौ. सुवर्णा सागर लोंढे (पीएसआय), विक्रम गोसाजी काळे (पीएसआय), सुहेल सिकंदर काझी (पीएसआय), कु.मोहिनी विजय जाधव (पीएसआय), कु.सुप्रिया महादेव आढाव (पीएसआय ), कु.पूजा संजय मदने (पीएसआय), स्वप्निल हनुमंत बनकर (पीएसआय), अनंत विठ्ठल हंकारे (पीएसआय), प्रशांतराज सोपानराव जाधव (पीएसआय), महेश बबनराव जगताप (पीएसआय), अजय सुनील पिसाळ (पीएसआय ), अक्षय तुकाराम घाडगे (पीएसआय), आशिष नितीन फरांदे (पशुधन विकास अधिकारी), सौ. नेहा अभिजीत जाधव (मंडल कृषी अधिकारी ), कु. निकिता दत्तात्रय नेवसे (मंडल कृषी अधिकारी) यांचा सन्मानित केले.

    कार्यक्रमास सेवानिवृत्त मंत्रालय उपसचिव दिनकरराव सोनवलकर , कृषी सहाय्यक सागर पवार, प्रा.रवींद्र कोलवडकर, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष धनंजय सोनवलकर, कृषी मित्र संजय सोनवलकर, फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाषराव सोनवलकर, प्रतिष्ठानचे खजिनदार डॉ. युवराज एकळ,तात्याबा सोनवलकर,भिमराव नाळे, पोपटराव सोनवलकर, अण्णासाहेब भुंजे उपस्थित होते. मान्यवरांचे  स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी केले. प्रास्ताविक सांस्कृतिक कमिटीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर यांनी केले सूत्रसंचालन व्याख्यानमाला कमिटीचे अध्यक्ष डॉ. सागर कराडे, प्रतिष्ठानचे  कार्याध्यक्ष संतोष भांड यांनी केले. उपस्थितांचे आभार  प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजयकुमार नाळे यांनी व्यक्त केले.




No comments