Breaking News

सोनवडी बुद्रुकच्या सरपंचपदी राजे गटाच्या सौ.पूनम राहुल राऊत यांची बिनविरोध निवड

Mrs. Poonam Rahul Raut of Raje group was elected as Sarpanch of Sonavadi Budruk unopposed

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.24 - सोनवडी बुद्रुक ता.फलटण गावच्या सरपंचपदी राजे गटाच्या सौ.पूनम राहुल राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली, सरपंच सौ.सुनीता बाळासाहेब शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झाल्यानंतर सरपंचपदाच्या निवडीसाठी घेण्यात आलेल्या विशेष सभेत सौ.पूनम राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी श्री.नामदेव नाळे व ग्रामसेवक श्री.एल.आर.गावडे यांनी काम पाहिले.

    सरपंच सौ.पूनम राऊत यांच्या निवडीबद्दल विधान परिषद मा.सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद मा.अध्यक्ष श्री.माणिकराव सोनवलकर, पंचायत समिती मा.सदस्य श्री.सचिन रणवरे यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले.

No comments