लोणंद रेल्वे स्टेशनवर अज्ञात इसमाचा खून
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.16 - लोणंद रेल्वेस्टेशन गार्डनमध्ये सिमेंटच्या बाकाजवळ लोणंद ता. खंडाळा येथे अनोळखी इसमाचा अज्ञात कारणासाठी डोक्यात सिमेंट कॉक्रेटचा मोठा तुकडा घालुन, गंभीर जखमी करुन खुन केल्याची घटना घडली आहे. दरम्यान खालील वर्णनाच्या व्यक्तीबद्दल कोणाला काही माहीती प्राप्त झाल्यास खालील क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन लोणंद पोलीस स्टेशनकडून करण्यात आले आहे. स.पो.नि. सुशिल बी. भोसले लोणंद पोलीस स्टेशन 7738147796, पो.उ.नि. शिवाजी काटे लोणंद पोलीस स्टेशन 9923360966.
लोणंद पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 15/7/2024 रोजी सकाळी 10.30 वाजताच्या पुर्वी (नक्की तारीख, वेळ माहीत नाही) लोणंद रेल्वेस्टेशन गार्डनमध्ये सिमेंटच्या बाकाजवळ लोणंद ता. खंडाळा जि. सातारा येथे कोणीतरी अज्ञात आरोपीने, ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी इसमाचा अज्ञात कारणासाठी डोक्यात सिमेंट कॉक्रेटचा मोठा तुकडा घालुन गंभीर जखमी करुन खुन केला आहे. त्याच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा फुल भायीचा शर्ट, राखडी रंगाची फुल पॅन्ट, निळी माचो कंपनीची अंडरवेअर, उजव्या हातात दोन पांढरे धातुची कडे, गळयात पांढरे धातुची साखळी चैन, उजवे हातावर त्रिशुलाचा टॅटु असलेला, त्याचे जवळ ठाणे ते लोणंद व लोणंद ते कोल्हापुर अशी दिनांक 14/7/2024 रोजीची रेल्वे तिकीटे होती.
No comments