कृषी दिनानिमित्त श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या उद्यानकन्यांकडून वृक्षारोपण
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील उद्यानकन्यांनी ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत समाजमंदिर, दुधेबावी येथे सोमवार दि.१ जुलै, २०२४ रोजी कृषी दिनानिमित्त सकाळी ९ ते १२ या वेळेत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रांत अधिकारी सचिन ढोले-पाटील, सरपंच मा. सौ. भावना सोनवलकर, सातारा जि.प.माजी अध्यक्ष श्री. माणिकराव सोनवलकर, पोलिस पाटील हणुमंतराव सोनवलकर, माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी प्रांत अधिकारी सचिन ढोले पाटील व उदयानकन्यांनी झाडांचे महत्त्व पटवून दिले. पिंपळ, जांभूळ, आंबा व वडाची झाडे लावण्यात आली.
या उपक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी , प्रा. जे. व्ही. लेंभे, प्रा. डॉ. ए. के. अभंगराव व समन्वयक प्रा.ए. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानकन्या श्रीखंडे पल्लवी, नाळे तृप्ती, वाघमारे संध्या, मतकर शर्वरी, सय्यद आयेशा, जाधव साक्षी व पिसाळ काजल यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.
No comments