Breaking News

दि हॉकी सातारा संघटनेच्या ७ महिला खेळाडूंची जूनियर व सब जुनिअर महाराष्ट्र हॉकी संघाच्या शिबिरासाठी निवड

Selection of 7 women players of The Hockey Satara Association for Junior and Sub Junior Maharashtra Hockey Team camp

     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ -  हॉकी इंडिया अंतर्गत हॉकी महाराष्ट्र यांच्या वतीने जुनिअर व सब ज्युनियर महिलाचे पिंपरी चिंचवड येथील एस्ट्रोटर्फ मैदानावराती महाराष्ट्र संघाचे राष्ट्रीय स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिर आयोजन करण्यात आले आहे. त्याकरिता  दि हॉकी सातारा संघटनेच्या हॉकी खेळाडूचे ज्युनिअर वयोगटामध्ये कु. श्रुती भोसले हिचे तर सब ज्युनियर मध्ये कु. तेजस्विनी कर्वे, कु. श्रुतिका घाडगे, कु. श्रेया चव्हाण, कु. अनुष्का चव्हाण, कु.अनुष्का केंजळे, कु. निकिता वेताळ अशा सात खेळाडूंची निवड झालेली आहे. सातारा जिल्ह्याच्यां इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा सात हॉकी महिला खेळाडूना महाराष्ट्र संघाच्या ज्युनियर व सब जुनिअर सराव शिबिरासाठी प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे.  यामुळे सातारा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये आणखी एक मानचा तुरा रोवला गेल्याची माहिती दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव तथा ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक तथा तालुका क्रिडा अधिकारी (नि.) यांनी माहिती दिली.

    या सर्व खेळाडूंना दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव तथा ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक श्री महेश खुटाळे सर व हॉकी प्रशिक्षक श्री सचिन धुमाळ सर प्रशिक्षण देत आहेत. प्रशिक्षणामध्ये सहाय्यक म्हणून श्री बी.बी. खुरंगे सर सहाय्य करत आहेत.

    सर्व प्रशिक्षक व खेळाडूंचे विधान परिषदेचे मा.सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दीपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, क्रिडा संमिती  चेअरमन शिवाजीराव घोरपडे,मधोजी हायस्कूलचे प्राचार्य सुधीर अहिवळे सर व  दि हॉकी सातारा  संघटनेचे अध्यक्ष श्री बाहुबली शहा, उपाध्यक्ष श्री सचिन लाळगे, खजिनदार श्री पंकज पवार, सदस्य श्री प्रवीण गाडे, श्री विजय मोहिते,श्री महेंद्र जाधव ,माजी राष्ट्रीय खेळाडू श्री शिरीष वेलणकर,श्री सुजीत निंबाळकर यांनी अभिनंदन केले.

No comments