गुरुकुल युथ अॅण्ड स्पोर्टस् अकॅडमी फलटणच्या खेळाडूंची राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ - गुरुकुल युथ अॅण्ड स्पोर्टस् अकॅडमी फलटणच्या चार खेळाडूंची निवड अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी झाली आहे, तसेच मुंबई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कराटे स्पर्धेमध्ये तीन खेळाडूंनी उज्वल यश संपादन केले आहे.
गुरुकुल युथ अॅण्ड स्पोर्टस् अकॅडमी फलटणच्या कु. दिव्या सुरज ढेंबरे,चि. विजयकृष्ण थोरात,चि. तेजस शिंदे, चि. कुणाल घनवट या खेळाडूंची राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तर चि. श्रेय दोषी, चि. वेदांत भोसले, चि. योगीराज भिंगारे या खेळाडूंनी मुंबई येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कराटे स्पर्धेत यश संपादन केले. या सर्व खेळाडूंचे अभिनंदन, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
No comments