Breaking News

मुधोजी महाविद्यालयात श्रीमंत निर्मलादेवी नाईक निंबाळकर राणीसाहेब यांची जयंती साजरी

Shrimant Nirmala Devi Naik Nimbalkar Rani Saheb's birth anniversary celebration at Mudhoji College

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ - फलटण एज्युकेशन सोसायटीच्या, मुधोजी महाविद्यालय,फलटण येथे श्रीमंत निर्मलादेवी नाईक निंबाळकर राणीसाहेब यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य प्रोफेसर डॉ. पंढरीनाथ कदम यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

    यावेळी बोलताना प्रोफेसर डॉ. प्रभाकर पवार म्हणाले, श्रीमंत निर्मलादेवी राणीसाहेब,या फलटण संस्थानचे अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर महाराजसाहेब यांच्या ज्येष्ठ स्नुषा तर श्रीमंत प्रतापसिंह नाईक निंबाळकर महाराज यांच्या सुविद्य पत्नी,व ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराजसाहेब यांच्या मातोश्री होत्या. त्यांचा स्वभाव सोज्वळ व सालस होता. त्या उत्तम प्रकारे लेखन करित असतं ,त्यांनी गद्यलेखन करताना परीकथेतील शुभा हे श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर ताईसाहेब यांच्या बालपणातील जीवनावर सकस असे पुस्तक लिहिले. ज्याचा मराठी बालसाहित्यामध्ये उल्लेख केला पाहिजे. त्यांचे काव्य लेखनही उल्लेखनीय स्वरूपाचे आहे. त्यांनी लक्ष्मीविलास पॅलेस, या निवासस्थानी विविध प्रकारची फुलझाडे, फळझाडे व मानवपयोगी वनस्पतींची झाडे लावली व तह हयात जोपासली. त्यांचा निर्मळ, निगर्वी स्वभाव फलटण तालुक्यातील गावांसाठी  आपलेपणाचा व माणुसकीचा होता. अशा थोर श्रीमंत निर्मलादेवी राणीसाहेबांना मुधोजी कॉलेजच्या वतीने जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संतोष कदम यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापकेत्तर  कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. शेवटी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

No comments