श्रीमंत शिवाजीराजे सीबीएसई स्कूलच्या मुलींचा संघाने सुब्रतो मुखर्जी फुटबॉल करंडक जिंकला
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २८ - शानबाग विद्यालयाच्या भरवशाच्या खेळाडूंनी प्रयत्न करूनही फलटणच्या श्रीमंत शिवाजीराजे स्कूलच्या भक्कम बचाव फळीमुळे निर्धारित वेळेत गोल नोंदविण्याची संधी हुकली. त्यानंतर पेनल्टी शूट आऊट वर गेलेल्या सामन्यात श्रीमंत शिवाजीराजे स्कुलच्या मुलींच्या संघाने बाजी मारत, सुब्रतो मुखर्जी करंडकावर नाव कोरले.
जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाद्वारे छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात नुकतीच १७ वर्षांखालील मुलींच्या गटाची सुब्रतो मुखर्जी करंडक फुटबॉल स्पर्धा झाली. अंतिम सामन्यात फलटणच्या श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई)ने पेनल्टीत विजय मिळविला. के. एस. डी. शानबाग विद्यालयास उपविजेतेपदावर समाधान मानवे लागले.
श्रीमंत शिवाजीराजेच्या यशस्वी संघात वृषाली शिंदे, पूर्वा भोसले,दिव्यांजली घोलप, वेदांती सोनवलकर, ईश्वरी बळीप, सई भोईटे, सई निंबाळकर, संस्कृती देशमुख, स्निग्धा चव्हाण, वेदिका पाटील, आराध्य बर्गे, शांभवी ढेंबरे , चैत्राली सपाट , अर्वती मोरे, श्रेया बोबडे, समृद्धी कदम यांचा समावेश आहे.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य शिरीषशेठ दोशी,सी.डी .पाटील सर, रमणलाल दोशी, प्रशासन अधिकारी निकम सर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे त्याचबरोबर सदस्य सचिन धुमाळ सर , शिरीष वेलणकर, महादेव माने , संजय फडतरे सर , प्रशिक्षक अमित काळे सर आणि प्रशालेच्या प्राचार्या दीक्षित मॅडम या सर्वांनी स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
No comments