मैदानी स्पर्धेत श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल एस.एस.सीच्या विद्यार्थ्यांचे यश
फलटण (गंधर्वता वृत्तसेवा) - दि.१७ फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन फलटण आयोजित फलटण तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा २०२४ या स्पर्धेमध्ये श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज फलटण (एस.एस.सी) शाळेतील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये शाळेच्या एकूण ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, त्यापैकी १७ विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये क्रमांक मिळवले.
1) स्वानंदी आनंद चव्हाण 10 वर्षा खालील मुली 50 मीटर प्रथम व 80 मीटर द्वितीय क्रमांक 2) जुई कमलाकर जगताप 10 वर्षा खालील मुली 80 मीटर तृतीय क्रमांक 3) राजवीर समीर धुमाळ 10 वर्षा खालील मुले 80 मीटर प्रथम क्रमांक 4) श्लोक अमर ननावरे 10 वर्षाखालील मुले 50 मीटर द्वितीय क्रमांक 5) श्रेया राजेंद्र पवार 12 वर्षा खालील मुली 100 मीटर द्वितीय क्रमांक 6) पलक गजेंद्रसिंह राजपुरोहित 16 वर्षा खालील मुली गोळा फेक प्रथम क्रमांक 7) जान्हवी जयवंत रणवरे 16 वर्षा खालील मुली गोळा फेक द्वितीय क्रमांक 8) प्राजक्ता मोहन पवार 18 वर्षा खालील मुली गोळा फेक प्रथम क्रमांक 9) कबी शफीमोहम्मद खान 18 वर्षा खालील मुले गोळा फेक प्रथम क्रमांक 10) केदार राजेंद्र नाळे 18 वर्षा खालील मुले गोळा फेक तृतीय क्रमांक11) जाई राजेंद्र जगदाळे 16 वर्षाखालील मुली 100 मीटर धावणे प्रथम क्रमांक 12) प्रणय महादेव जगताप 14 वर्षाखालील मुले 100 मीटर धावणे प्रथम क्रमांक 13) अनिकेत राजेंद्र राऊत 16 वर्षा खालील मुले 400 मिटर धावणे प्रथम क्रमांक, 14) आदित्य योगेश बुरुंगले 16 वर्षा खालील मुले 100 मिटर धावणे प्रथम क्रमांक 15) प्रणय मारुती पिसाळ 16 वर्षा खालील मुले 100 व 400 मिटर धावणे द्वितीय क्रमांक मिळवला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्या संध्या फाळके, सुहास कदम सर आणि विद्यालयातील शिक्षक आणि पालक यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे हे यश प्राप्त झाले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे विक्रमसिंह नाईक निंबाळकर, सचिव श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर, अध्यक्ष फलटण क्रीडा समिती श्री. शिवाजीराव घोरपडे, प्रशासकीय अधिकारी श्री.अरविंद सखाराम निकम, प्रचार्या संध्या फाळके, सुपरवायझर महेश निंबाळकर, शिक्षक शिक्षिका आणि इतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
No comments