Breaking News

राज्य अर्थसंकल्पात फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी दहा कोटी रुपये मंजूर - मा.खा. रणजीतसिंह निंबाळकर

Ten crore rupees sanctioned for Phaltan Koregaon assembly constituency in the state budget -  Ranjitsinh Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१४ -नुकताच झालेल्या राज्य अर्थसंकल्पामध्ये फलटण तालुक्यातील ४५ गावांमध्ये १० कोटी रुपयांचे रस्ते, पुल, संरक्षक भिंत,मोरीचे बांधकाम, इत्यादी कामांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सहकार्यातून निधी मंजूर झाला असल्याची माहिती माझे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

    फलटण तालुक्यातील जनतेने माझेवर भरभरून प्रेम केले आहे. या तालुक्यातुन १७ हजार मताचे लीड लोकसभेला मला दिले आहे. त्या ऋणातून मी उतराई होऊ शकत नाही, या तालुक्याच्या विकासासाठी जी कामे यापूर्वी मंजूर केलेली आहे ती पुर्ण करणे  व भविष्यात येणाऱ्या सर्व अडचणीसाठी या तालुक्यातल्या जनतेच्या कायम पाठीशी उभे राहणार आहे. मी मंजुर केलेल्या पाणी योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मी प्रशासनाला दिले आहेत. या तालुक्यातील जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पुर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. विधानसभा मतदारसंघातील जनतेला व कार्यकर्त्यांना  वाऱ्यावर सोडणार नाही. पुढील काळात राज्य सरकार व केंद्र शासनाच्या वतीने जेवढा निधी आणता येईल तेवढा आणला जाईल.यावेळी राज्य सरकारचे व अधिकार्‍यांचे रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी आभार मानले.

No comments