फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचा हा उपक्रम कौतुकास्पद - प्राचार्य पी.एच.कदम ; फलटण तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत ९५० खेळाडूंचा सहभाग
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मैदानी क्रीडा स्पर्धा भरवल्यामुळे, हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांना आगामी शालेय स्पर्धेत फायदा होणार असल्याने, फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य पी.एच. कदम सर यांनी केले. दरम्यान फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन फलटणच्या वतीने मुधोजी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर भरवण्यात आलेल्या फलटण तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये ९५० खेळाडूंनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन फलटणच्या वतीने भरवण्यात आलेल्या फलटण तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ प्रसंगी मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य पी.एच कदम सर बोलत होते. याप्रसंगी दुधेबावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर, उपप्राचार्य वेदपाठक सर व इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्राचार्य कदम सर म्हणाले की खेळामुळे आपले मनगट मन व मेंदू सशक्त होतात, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने खेळामध्ये सहभाग घ्यायला हवा असे आवाहन करून खेळाडूंना मार्गदर्शन केले.
फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन फलटणच्या वतीने भरवण्यात मैदानी क्रीडा स्पर्धेमुळे चांगले खेळाडू घडण्यास मदत होणार आहे, त्यामुळे अशा स्पर्धा तालुक्यात नियमितपणे भराव्यात. खेळामुळे आपले आरोग्य चांगले राहते,त्यामुळे प्रत्येकाने कोणता ना कोणता खेळ खेळावा असे सांगून खेळाडूंना दुधेबावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी मार्गदर्शन केले.
शुभारंभ कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये मैदानी क्रीडा स्पर्धा भरवण्याचा उद्देश व संघटनेचे कामकाज उपाध्यक्ष जनार्दन पवार स्पष्ट केला. संघटनेचे सचिव नामदेव मोरे सर यांनी यावेळी मैदानी क्रीडा स्पर्धे संदर्भात सर्व सूचना व नियम सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे खजिनदार प्रा. तायप्पा शेंडगे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या आभार संघटनेचे सहसचिव ॲड. रोहित अहिवळे यांनी मानले.
फलटण तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे आहेत.
१८ वर्षाच्या आतील मुले - १०० मीटर धावणे स्पर्धेत मनीष महेश चोरगे प्रथम क्रमांक, प्रथमेश सचिन कदम द्वितीय क्रमांक, प्रथमेश यशवंत निंबाळकर तृतीय क्रमांक. ४०० मीटर धावणे स्पर्धेत प्रथमेश यशवंत निंबाळकर प्रथम क्रमांक, पियुष संजय पवार द्वितीय क्रमांक, ओंकार सचिन गायकवाड तृतीय क्रमांक. १६०० मीटर धावण्याचे स्पर्धेत समर्थ बापूराव दडस प्रथम क्रमांक,दिगंबर शरद सूर्यवंशी द्वितीय क्रमांक, शंभूराज संजय जगताप तृतीय क्रमांक. गोळा फेक स्पर्धेत कबी शफी मोहम्मद खान प्रथम क्रमांक, आदित्य विजय सोडमिसे द्वितीय क्रमांक तर केदार राजेंद्र नाळे याचा तृतीय क्रमांक आला.
१८ वर्षाच्या आतील मुली - 100 मीटर धावणे स्पर्धेत स्नेहा संदीप कुंभार हिचा प्रथम क्रमांक आला. प्रतिज्ञा महेंद्र खिलारे हिचा द्वितीय तर तेजल प्रशांत जगताप हिचा तृतीय क्रमांक आला. 400 मीटर धावणे स्पर्धेत प्रणाली सतीश कचरे प्रथम क्रमांक, प्रतिज्ञा महेंद्र खिलारे द्वितीय क्रमांक, कोमल महेंद्र खिलारे तृतीय क्रमांक. १६०० मीटर धावणे स्पर्धेत कोमल महेंद्र खिलारे प्रथम क्रमांक, प्रिया राजेंद्र फरांदे द्वितीय क्रमांक, अंजली किसन बोरकर तृतीय क्रमांक. गोळा फेक स्पर्धेत प्राजक्ता मोहन पवार प्रथम क्रमांक, सई अनिल बागल द्वितीय क्रमांक, अनुष्का मंगेश चव्हाण तृतीय क्रमांक.
१६ वर्षाच्या आतील मुले - 100 मीटर धावणे स्पर्धेत आदित्य योगेश बुरुंगले प्रथम क्रमांक, प्रणय मारुती पिसाळ द्वितीय क्रमांक, ऋषीराज दिलीप खराडे तृतीय क्रमांक. 400 मीटर धावणे स्पर्धा अनिकेत राजेंद्र राऊत प्रथम क्रमांक, प्रणय मारुती पिसाळ द्वितीय क्रमांक, ओंकार मोहन कानडे तृतीय क्रमांक. 800 मीटर धावणे स्पर्धा पियुष अमोल बोबडे प्रथम क्रमांक, ओंकार मोहन कानडे द्वितीय क्रमांक, विश्वजीत दत्तात्रय गोडसे तृतीय क्रमांक. गोळा फेक स्पर्धा ओम विशाल जगताप प्रथम क्रमांक, गणेश आनंद सावंत द्वितीय क्रमांक, शिवराज बापूराव पवार तृतीय क्रमांक.
१६ वर्षाच्या आतील मुली - 100 मीटर धावणे स्पर्धा जाई राजेंद्र जगदाळे प्रथम क्रमांक, उत्कर्षा दत्तात्रय यादव द्वितीय क्रमांक, प्रतीक्षा अनिल मदने तृतीय क्रमांक. 400 मीटर धावणे स्पर्धा संचिता मुकुंद गायकवाड प्रथम क्रमांक, प्रतीक्षा अनिल मदने द्वितीय क्रमांक, शिवानी विनोद चौधरी तृतीय क्रमांक. 800 मीटर धावणे स्पर्धा किशोरी राजेंद्र हिप्परकर प्रथम क्रमांक, श्रद्धा आनंदराव चव्हाण द्वितीय क्रमांक, शिवानी महादेव नर्वे तृतीय क्रमांक. गोळा फेक स्पर्धा पंलक गजेंद्रसिंह राजपुरोहित प्रथम क्रमांक, जान्हवी जयवंत रणवरे द्वितीय क्रमांक, कोमल कोंडीबा पडळकर तृतीय क्रमांक.
१४ वर्षाच्या आतील मुले - 100 मीटर धावणे स्पर्धा प्रणय महादेव जगताप प्रथम क्रमांक, शिवम भगवान पिसाळ द्वितीय क्रमांक, अनुराग संतोष गावडे तृतीय क्रमांक. 400 मीटर धावणे स्पर्धा राजवीर अमोल गोरवे प्रथम क्रमांक, अनुराग संतोष गावडे द्वितीय क्रमांक, शशिकांत नाळे तृतीय क्रमांक. ६०० मीटर धावणे स्पर्धा प्रणव बाळू खोलवडकर प्रथम क्रमांक, कुणाल नंदकुमार बनसोडे द्वितीय क्रमांक, अजित शंकर शिरतोडे तृतीय क्रमांक. गोळा फेक स्पर्धा शिवम भगवान पिसाळ प्रथम क्रमांक, सर्वज्ञ सुनील कचरे द्वितीय क्रमांक, रुद्र विलास नेरकर तृतीय क्रमांक.
१४ वर्षाच्या आतील मुली - 100 मीटर धावणे स्पर्धा सोनाली जालिंदर खरात प्रथम क्रमांक, श्रावणी प्रकाश सूर्यवंशी द्वितीय क्रमांक, सोनी आनंदराव कारळे तृतीय क्रमांक. 400 मीटर धावणे स्पर्धा अमृता अंकुश डंबरे प्रथम क्रमांक, गायत्री संदीप खरात द्वितीय क्रमांक, काजल भिवा कचरे तृतीय क्रमांक. गोळा फेक स्पर्धा करिष्मा प्रेमचंद धरकार प्रथम क्रमांक, श्रीमयी सुरेंद्र कुमार कोरडे द्वितीय क्रमांक, श्रुती दत्तात्रय कोलवडकर तृतीय क्रमांक.
१२ वर्षाच्या आतील मुले - 100 मीटर धावणे स्पर्धा शंभूराज नितीन चतुरे प्रथम क्रमांक, अंशुमन संतोष सुळ द्वितीय क्रमांक, समर्थ अमरजीत यादव तृतीय क्रमांक. ३०० मीटर धावणे स्पर्धा शंभूराज नितीन चतुरे प्रथम क्रमांक, सार्थक शिवाजी वाघ द्वितीय क्रमांक. 200 मीटर धावणे स्पर्धा सार्थक शिवाजी वाघ प्रथम क्रमांक, स्वराज धनराज चौधरी द्वितीय क्रमांक.
१२ वर्षाच्या आतील मुली - 100 मीटर धावणे स्पर्धा अक्षता विजय सस्ते प्रथम क्रमांक, श्रेया राजेंद्र पवार द्वितीय क्रमांक, सौरवी संतोष सोनवलकर तृतीय क्रमांक. ३०० मीटर धावणे स्पर्धा कादंबरी जीवन भगत प्रथम क्रमांक, अक्षरा कृष्ण कृष्णात खुसपे द्वितीय क्रमांक, काव्य नितीन गिरमे तृतीय क्रमांक. 200 मीटर धावणे स्पर्धा अक्षदा विजय सस्ते प्रथम क्रमांक, स्वरा मुकुंद गायकवाड द्वितीय क्रमांक, कादंबरी जीवन भगत तृतीय क्रमांक.
१० वर्षाच्या आतील मुले - 100 मीटर धावणे स्पर्धा राजवीर धीरज कचरे प्रथम क्रमांक, पार्थ रोहन मोरे द्वितीय क्रमांक, रुद्र सुजय जगताप तृतीय क्रमांक. 80 मीटर धावणे स्पर्धा राजवीर समीर धुमाळ प्रथम क्रमांक, आशीर्वाद उमेश रणवरे द्वितीय क्रमांक, शौर्य अमोल गोडसे तृतीय क्रमांक. 50 मीटर धावणे स्पर्धा राजवीर धीरज कचरे प्रथम क्रमांक, श्लोक अमर ननावरे द्वितीय क्रमांक, धैर्यप्रताप विजय कदम तृतीय क्रमांक.
१० वर्षाच्या आतील मुली - 100 मीटर धावणे स्पर्धा पूर्व विजय सस्ते प्रथम क्रमांक, प्रगती राजेंद्र सुळ द्वितीय क्रमांक. 80 मीटर धावणे स्पर्धा पूर्व विजय सस्ते प्रथम क्रमांक, स्वानंदी आनंद चव्हाण द्वितीय क्रमांक, जुई कमलाकर जगताप तृतीय क्रमांक. 50 मीटर धावणे स्पर्धा स्वानंदी आनंद चव्हाण प्रथम क्रमांक, तेजस्विनी अमोल खलाटे द्वितीय क्रमांक, ईशानी प्रदीप होळकर तृतीय क्रमांक.
८ वर्षाच्या आतील मुले - 60 मीटर धावणे स्पर्धा प्रणित हनुमंत एकळ प्रथम क्रमांक, प्रणव सचिन भिसे द्वितीय क्रमांक. 30 मीटर धावणे स्पर्धा राम दादा खरात प्रथम क्रमांक, शारण्य प्रदीप काशीद द्वितीय क्रमांक, स्वराज सोमनाथ तांबे तृतीय क्रमांक.
८ वर्षाच्या आतील मुली - 60 मीटर धावणे स्पर्धा आरोही जगदीश गाडे प्रथम क्रमांक, शरण्या अमित शेंडे द्वितीय क्रमांक. 30 मीटर धावणे स्पर्धा आरोही जगदीश गाडे प्रथम क्रमांक, अनविता सचिन भोंग द्वितीय क्रमांक.
No comments