Breaking News

अमृत २ योजने अंतर्गत फलटण शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळणार - मा. खा. रणजितसिह नाईक निंबाळकर

Under Amrut 2 Yojana, crores of rupees will be provided for the development of Phaltan city - Ranjitsih Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३० - मा.खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर  यांनी काल दिल्ली येथे शहर विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली.रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी यापूर्वी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना व त्या वेळेचे केंद्रीय शहर विकास मंत्री हरजितसिंग पुरी यांना पत्राद्वारे  माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण व पंढरपूर या शहरासाठी केंद्र शासनाच्या अमृत २ या योजनेअंतर्गत समावेश व्हावा व  शहराचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध  करुन देण्यात यावा ही मागणी केली होती. याबाबत बजेट मध्ये याची दखल घेऊन, फलटण व पंढरपूर या शहराचा समावेश अमृत २ या योजने मध्ये झाला असल्याची माहिती माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

     या योजनेसाठी महाराष्ट्राला ३१ हजार ७२२ कोटी रुपये मंजूर झाले असून, या योजनेच्या अंतर्गत फलटण व पंढरपूर शहराचा  २० वर्षापुढील पूर्ण डीपी प्लॅन तयार होणार आहे. शहराची वाढती लोकसंख्या विचारात व घेऊन शहराला पुरेल एवढे पाणी कसे उपलब्ध होईल, त्यासाठी लागणारे पाण्याचे नियोजन व वितरण व्यवस्था त्यासाठी टाक्या, पाईप लाईन, प्रत्येक घरात  नळ कनेक्शन, त्याच्यामध्ये शहराला पुरेल एवढा पाण्याचा बॅलन्स टॅंक, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, अंतर्गत पूर्ण पाईपलाईन, प्रत्येक घराला नळाचे कनेक्शन, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारे प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया करून शहरातील झाडे जगवणयासाठी योजना, जनतेला पाण्याचे महत्व समजण्यासाठी जनजागृती, त्यासाठी शिक्षाणाची गरज या गोष्टी होणार आहेत. या योजनेतून स्वच्छ व शुद्ध पाणी लोकांना मिळणार आहे. यामुळे फलटण शहराचा कायापालट होणार असल्याची माहिती मा.खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.  

No comments