जाधववाडी येथून वारकरी वृद्ध बेपत्ता
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.16 - पंचमुखी हनुमान मंदिर, जाधववाडी, ता. फलटण येथून, नारायण लक्ष्मण पोपळघट, वय- ७० वर्षे, रा. कहाकर बुद्रुक ता. शेनगाव, जि. हिंगोली हे बेपत्ता झाले असल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
दि. ९/७/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पंचमुखी हनुमान मंदिर समोर, विमानतळ, फलटण येथुन, नारायण लक्ष्मण पोपळघट, वय- ७० वर्षे, रा. कहाकर बु||, ता. शेनगाव, जि- हिंगोली हे बाथरूम जातो असे म्हणून निघून गेले असल्याची फिर्याद मुलगी रेणुका शिवाजी काळे यांनी दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार फाळके करीत आहेत.
उंची ५ फुट ५ इंच, रंगाने- गोरा, अंगाने-सडपातळ, नाक-सरळ, डोळे- काळे, केस- पांढरे, अंगात नेसणेस पांढऱ्या रंगाचा शर्ट व धोतर, टोपी पांढऱ्या रंगाची, पायात काळ्या रंगाचे बुट, मराठी भाषा बोलतात अशा वर्णनाचे वृद्ध बेपत्ता आहेत.
No comments