Breaking News

जिहे कटापूर - उरमोडी प्रकल्पातून पाणी सोडून बंधारे भरून घ्यावे व येराळवाडी तलावात पाणी सोडावे - खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे केली मागणी

Water should be released from Katapur-Urmodi project to fill dams and water should be released in Yeralwadi lake. - Mohite-Patil

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२ - म्हसवड ता. माण या नगर परिषदेला सध्या ८ दिवसातून एकदा पिण्याचे पाण्याचा पुरवठा केला जात आहे व सध्या वाडीवस्तीसाठी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे येथील नागरिकांची पाण्यासाठी मोठी वणवण चालू आहे. तरी म्हसवड येथील माणगंगा नदीमध्ये उरमोडी प्रकल्पाचे अथवा जिहे कटापुर प्रकल्पाचे पाणी सोडुन बंधारे भरल्यास येथील पाणी पातळी वाढले व विहरी, बोअर चालू होउन पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल. तरी म्हसवड येथील माणगंगा नदीमध्ये उरमोडी प्रकल्प अथवा जिहेकटापुर प्रकल्पातून पाणी सोडावे अशी मागणी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली.

    तसेच खटाव तालुक्यातील येरळवाडी मध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता ही ३२.८० द.ल.घ.मी. असून या प्रकल्पामध्ये सध्या ३३% पाणी साठा उपलब्ध आहे. या प्रकल्पावर ४५ गावांच्या पाणी पुरवठा योजना, औद्योगीक वसाहतीसाठी लागणारे पाणी तसेच लाभक्षेत्रातील शेती सिंचनासाठी लागणारे पाणी प्रकल्प आराखड्यामध्ये सामाविष्ठ आहे.

    सध्या लाभक्षेत्रामध्ये पाऊसमान कमी असल्यामुळे व धरणातील उपलब्ध पाणी साठा लक्षात घेता, भविष्यातील पिण्याच्या पाण्याच्या योजना, औद्योगीकरणासाठी लागणारे पाणी तसेच शेती सिंचनासाठी पाण्याची नितांत गरज भासणार आहे. यासाठी या प्रकल्पामध्ये जिहे कटापूर योजना किंवा उरमोडी प्रकल्पामधून पाणी सोडून येरळवाडी तलाव भरणे अत्यंत गरजेचे आहे.तरी येरळवाडी प्रकल्पात पाणी सोडणेबाबत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे मागणी केली आहे.



No comments